'त्या' सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच; पोलिसांचा मोठा खुलासा

'त्या' सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच; पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे | Pune

येथील दौंड तालुक्यातील (Daund Taluka) यवत गावात (Yawat village) एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र,अखेर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना (Police) १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत भीमा नदीपात्रात (Bhima River) चार मृतदेह मिळून आले होते. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. यानंतर केलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह सापडले होते.

त्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास केला असता पूर्व वैमनस्यातून चुलत भावांनी हत्या केल्याचे समोर आले आहे.सहा महिन्यापूर्वी या आरोपी चुलत भावांपैकी एकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू नसून मोहन पवार यांनी खून केल्याचा संशय या चौघांना होता त्यामुळे ही हत्या (Murder) झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

तर मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी मृतांची नावे आहेत.

तसेच याप्रकरणी पोलिसांनी ३०२ चा गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक (Arrested) करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com