Monday, April 29, 2024
HomeनाशिकNashik : संतापजनक! वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर बळजबरीने नाचवलं; गुन्हा दाखल

Nashik : संतापजनक! वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर बळजबरीने नाचवलं; गुन्हा दाखल

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) एका खासगी वसतिगृहात (Private Hostel) शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना (Minor Students) बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने (Pahine) येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या वर्षापासून मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शाळा (School)चालु होण्यासाठी पंधरा दिवस बाकी असतानाच वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुट्टीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात मुलींना संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला.

Nashik Crime News : अंगावरील दागिने लुटून वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल

तसेच या संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी तीन हजार पाचशे रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून तेथे मे महिन्याच्या सुट्टीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक (Tourists) येत असतात.

या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तर शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे (Parents) केली होती. वसतिगृहाच्या शिक्षिका मुलींना पारंपरिक नृत्य शिकवत असताना पर्यटक ते पाहत असतील. आम्ही मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही असा दावा एका शिक्षकाने केला.

Nashik Accident News : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, थरारक Video आला समोर

या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच संशयित आरोपींना (Suspected Accused) अद्याप अटक करण्यात आलेली नसून या घटनेचा संपूर्ण तपास नाशिक ग्रामीणचे उपअधिक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व हवालदार खांदवे करीत आहे.

तर एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली असून महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती मधे यांनी दिली आहे.

Ayodhya Ram Mandir : ठरलं! ‘या’ दिवशी होणार प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

दरम्यान, याप्रकरणी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक, रा. राणेनगर, नाशिक आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात (Wadivarhe Police Station) फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता चौकशीत नेमके काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Jayant Patil : ‘जयंत पाटील भाजपच्या वाटेवर’; शिंदेंच्या शिवसेनेतील ‘या’ नेत्याचा मोठा दावा

- Advertisment -

ताज्या बातम्या