पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई /प्रतिनिधी
राज्यात ७५ हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावे तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.

सध्या ७ हजार २३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

भरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे आणि कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com