राज्यात लवकरच पोलिस भरती; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

राज्यात लवकरच पोलिस भरती; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील गृह विभागात ( home department of the state)लवकरच ७ हजार पोलिसांची भरती (Recruitment of Police)करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच ७ हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी ७ हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर येथील घटनेमधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेतील पोलीस अधिकारी संजय सानप यांची विभागीय चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अन्य एका लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल. यामध्ये तथ्य आढळल्यास विशेष कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com