
नाशिक । प्रतिनीधी Nashik
शहर पोलिसांनी पंचवटी (Panchavati )भागात मसाज पार्लरच्या ( massage parlour )नावाखाली देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.
पी. सी. बी. एम. ओ.बी मध्यवर्ती गुन्हेशाखा नाशिक शहर शाखेकडील अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करण्याऱ्या पार्लर चालकांचा शोध घेत असतांना पो.हवा. शेरखान पठाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, पंचवटीतील मधूबन कॉलनीत एका बिल्डिंगमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे.
त्या आधारे पोलीस उपआयुक्त (गुन्हे), प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. डॉ. अंचल मुदगल, पी.सी.बी.एम. ओ. बी मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर यांनी छापा पथक तयार करून त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो का, याची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवले होते.
त्यात पोलिसांना त्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याने छापा टाकून कारवाई करून मजाज पार्लरच्या नावाखाली दोन आरोपी महिला या मुली व महिलांना पैशांचे प्रलोभन देवुन त्यांचेकडुन अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय करून घेतांना दोन पीडित महिला या ठिकाणी मिळुन आल्या.
फ्लॅट मालक महिला आरोपी व तिची साथीदार या स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्याकरीता मुली व महिलांना भाग पाडले. म्हणून त्यांचेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात ठाणे ( Panchavati Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला.