मालेगावी रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचे छापे

मालेगावी रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचे छापे

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

त्रिपुरातील हिंसाचाराचे निषेधार्थ मालेगावी बंद पुकारलेल्या रझा अकादमी (rajha Academy) या संघटनेच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्री छापा मारून झडती घेत काही पत्रके व दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.

रझा अकॅडमीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरात नवीन बसस्थानक (New Bus Stop) परिसरात जुना आग्रा रोड (Old Agra road) वर दगडफेक जाळपोळ सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची नासधूस करण्याचे प्रकार घडले होते. पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने तीन अधिकाऱ्यांसह (Three Police officers injured) सात पोलीस कर्मचारी (Seven Police Injured) व तीन सामाजिक कार्यकर्ते गंभीर रित्या जखमी झाले होते.

मालेगाव बंदला लागलेले हिंसक वळण तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Cabinate Minister Nawab Malik) यांनी काल भाजप नेते अशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी भेट देत तिथे बैठक झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मालेगावी पोलिसांनी रझा अकादमीच्या लले चौकातील (lalle chauk) कार्यालयावर रात्री छापा मारून पंचसमक्ष (police raid) कार्यालयाचे कुलूप जबाबदार पदाधिकारी न आल्याने तोडण्यात घेऊन झडती सत्र राबवले गेले. पोलीस उपाधीक्षक लता दोंदे (DSP Lata Donde) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांना काही पत्रके संगणक व दस्तऐवज मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (Malegaon Central MLA Maulana mufti mohammad ismail) यांनी धार्मिक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांतर्फे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पत्रकारांशी वार्तालाप करताना केला होता.

मात्र पोलिसांनी काल रात्री थेट रझा अकॅडमीच्या कार्यालयावर छापा मारत आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. मालेगाव दंगल सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्राणघातक हल्ले जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पुरावे तपासून पोलिसांतर्फे अटकेची कारवाई केली जात आहे.

कुणावरही आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत केलेली कारवाई कुठलाही दबाव नसल्याचे संकेत देणारी ठरली आहे.

मध्यरात्री शहरातील इस्लामपुरा भागातील रझा अकादमीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. यात काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे किंवा काय याची तपासणी सुरु आहे.

चंद्रकांत खांडवी, अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com