सलाम! पोलिसाच्या धाडसाने वाचला तरुणाचा जीव; पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

सलाम! पोलिसाच्या धाडसाने वाचला तरुणाचा जीव; पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील रेल्वेगाडीसमोर एक तरुण आत्महत्या करणार तोच एका पोलिसाने धाडस दाखवत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. यानंतर या तरुणाला रुळावरून लोटून देत त्याचा जीव वाचविला....

ही संपूर्ण घटना सीसीटिव्हित कैद झाली असून या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वदूर कौतुक होत आहे. मुंबईतील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर (Vitthalwadi railway station) एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. (Attempted suicide) पण वेळीच पोलीस कर्मचाऱ्याने (maharashtra police) धाव घेत या तरुणाणाला रुळावरून विरुद्ध दिशेला ढकलून दिले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर काल (दि २५) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. काही वेळेनंतर समोरून मेल एक्स्प्रेस आली. रेल्वे समोर येत असल्याचे पाहून तरुणाने रुळावर उडी घेतली.

रुळावर उडी मारल्यानंतर हा तरुण आधी खाली बसला नंतर उभा राहिला. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पाहिले आणि क्षणाचा ही विलंब न करता थेट रुळावर उडी घेतली.

या तरुणाला पकडून रुळावरून बाजूला ढकलताच भरधाव एक्स्प्रेस सुसाट निघून गेली.अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा असाच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com