पोलीस हायटेक अन् वाहने पुरातन?

वाहन चक्क फिरले सव्वासहा लाख किलोमीटर
पोलीस हायटेक अन् वाहने पुरातन?

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालय (Nashik Police Commissionerate) व नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police)अधिकार्‍यांना दिल्या गेलेल्या शासकीय वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत असल्याने शासनाने ग्रामीण अधिका़र्‍यांची वाहने बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक ग्रामीणच्या एका उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याचे वाहन चक्क सव्वासहा लाख किलोमीटर फिरल्याचे सूत्रांकडून एका पत्रकार परिषदेदरम्यान उघडकीस आले. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस अधिकार्‍यांच्या वाहनांची अवस्था हि अतिशय चांगली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत उपायुक्त,सहाय्यक आयुक्त यांना शहरी भागात प्रशासकीय कामकाजानिमित्त शासनातर्फे सुस्थितीतील आलिशान वाहन देण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती यापेक्षा अगदी उलट आहे. नाशिक ग्रामीणची हद्द हि इगतपुरी पासून ते सिन्नर, वावी, येवला,मालेगाव,कळवण, सुरगाणा म्हणजे गुजरात सीमे पर्यंत व्यापलेली आहे. त्मामुळे पोलीस अधीक्षकांसह अप्पर अधीक्षकांना जिल्हाभर सेवा बजावण्याकरिता फिरावे लागते.

उपअधीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान पाच ते सहा पोलीसठाण्याच्या हद्दीत भेट द्यावी लागते. गेल्मा काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यात काही ना काही गुन्हे दाखल करण्यात मेतात. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन व सूचना करण्याकरिता उपअधीक्षकांना पोलीस ठाण्यांना भेटी द्याव्या लागतात.मात्र त्यांच्या कडे असलेल्या सरकारी चारचाकी वाहनांची अवस्था बिकट होत चालली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्माने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.अशातच पोलिस अधिकार्‍यांकडे असलेले वाहन लाखो किलोमीटर फिरल्याने जर रस्त्यातच बंद पडले तर पोलीस प्रशासनावर नामुष्की ओढली जाण्याची शक्याता नाकारता येणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com