
मुंबई | Mumbai
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काल जीवे मारण्याची धमकी (Death threats) देणारा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणू अशीही धमकी या फोन कॉलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी (Police) तात्काळ गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली होती. यानंतर धमकी देणाऱ्याचे नाव समोर आले आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुबई नाही तर बेळगाव (Belgaum) तुरुंगातून धमकीचा फोन आला होता. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव जयेश पुजारी असे असून तो कुख्यात गुंड असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली आहे.
तसेच या धमकी प्रकरणात जयेश पुजारी आणि त्याची टोळी असून अंडरवर्ल्डचे काही मोठे गँगस्टर यामागे असल्याचे बोलले जात असून यापूर्वी देखील जयेशने तुरुंगातून (prison)अशाच पद्धतीने अनेकवेळा मोठ्या अधिकाऱ्यांना धमकीचे कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणाच्या पुढील तपासासाठी नागपूर (Nagpur) पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.