प्रचंड पोलिस बंदोबस्तात अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला

jalgaon-digital
1 Min Read

अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी मध्यरात्री आमदार रवी राणा (Ravi Rana) व त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj Statue)यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी घेतल्या नव्हत्या. त्यामुळे प्रचंड पोलिस बंदोबस्तात (police)हा पुतळा काढण्यात आला. यावरुन आता अमरावतीत तणाव निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj Statue) यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस (Police) प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. त्यापुर्वी काल, रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ३ वाजता पुतळा काढण्यात आला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप राणा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरील व्हिडिओत केला आहे. पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलंय. तर, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काँग्रेसने तिकिट दिलेली ‘बिकनी गर्ल’ अर्चना गौतम कोण आहे?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *