पोलीस दादांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण होणार; नवा शासन निर्णय आला

PSI
PSI

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यातील हजारो पोलीस शिपाई (Police Constable), हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक (police sub inspector) होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज झाला. यामुळे पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse patil) यांनी व्यक्त केला आहे....

राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक (psi) या अधिकारी पदावर पोहचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टीकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता. या निर्णायाला आज मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM udhav thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit pawar) यांचे आभार मानले आहेत.

या पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरीता मिळणार्‍या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल.

यामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचार्‍यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.

या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक(ASI) या पदोन्नती (promotion) साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे.

यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलिस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलिस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे 17 हजार 71, इतकी वाढतील. पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने गरज भागेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com