करोनाबाधित रुग्णसंख्या
करोनाबाधित रुग्णसंख्या
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर असताना झाली होती करोनाची लागण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर | वार्ताहर

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरुण वामन टोंगारे यांचा करोनामुळे मृत्यू झाला. लॉकडाऊन काळात प्रतिबंध क्षेत्रात टोंगारे यांनी कर्तव्य बजावले होते.

त्यानंतर सुमारे वीस दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते रजेवर गेले होते. करोना बाधित झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

परंतु त्यांची तब्येत बरी होण्यास साथ देत नसल्याने तातडीने मुंबई येथील खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

परंतु मंगळवार (दि३०) रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com