नियमांचे पालन करत शिवजयंती साजरा करा : पोलिस आयुक्त

नियमांचे पालन करत शिवजयंती साजरा करा : पोलिस आयुक्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती उत्सव साजरा करण्यासाठी नाशिक (Nashik) शहरात ठिकठिकाणी मोठी तयारी सुरु आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती (Shivjayanti) उत्सव साजरा होणार आहे.

हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने (Police Administration) योग्य ती खबरदारी घ्यायचे ठरवले आहे. शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत साजरा करावा, तसेच सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे सादर करावेत अशा सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Police Commissioner Ankush Shinde) यांनी दिल्या आहेत.

यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी मंडळांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. सामाजिक देखावे, प्रबोधन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम घेत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा, सामाजिक दृष्टीकोनातून काम करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. यंदा सामाजिक प्रबोधन (Enlightenment) करणार्‍या मंडळांचा सन्मान देखील करण्यात येईल, अशी घोषणाही केली.

उत्सवाप्रसंगी (celebration) पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, शासनाच्या आदेशाप्रमाणे डिजेला (DJ) कुठल्याही प्रकारची परवानगी नसणार आहे, सर्व मंडळांनी परवानगी घेऊन जयंती साजरी करावी, वेळेचे पालन करावे, फलक बॅनरची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. त्यावरील मजकुरांची पोलिस (police) पाहणी केल्यानंतर परवानगी देण्यात येईल, कुठल्याही देखावा सादर करतांना पोलिस त्यांची पाहणी करून परवानगी देणार आहेत. पोलिस प्रशासन अहोरात्र आपल्या मदतीला असून कुठल्याही समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आज पोलिस आयुक्तालयातर्फे (Commissionerate) शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समिती सदस्य व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले, दिनेशकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, मनपा उपायुक्त अर्चना तांबे , सिव्हील सर्जन डाॅ.अशोक थोरात, स्मार्ट सिटीचे अभियंता दिनेशकुमार वंजारी यांच्यासह सर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मनपा विभागीय अधिकारी व शासनाच्या इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com