Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : लेटर बॉम्बनंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Video : लेटर बॉम्बनंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी काल मोठा लेटर बॉम्ब टाकला. जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचे (revenue officers) कार्यकारी दंडाधिकारी पदाचे (Executive Magistrate) अधिकार काढून घेण्याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले. या पत्रामुळे काल एकच खळबळ उडाली होती. आज पांडेय यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील माझा दीड वर्षांचा अनुभव आणि २३ वर्षांचा आयपीएस अधिकारी म्हणून माझा अनुभव आहे. नाशिक शहराचा जमिनीविषयीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करताना लक्षात आले की सध्या औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण मोठ्या झपाट्याने होत आहे. त्यामुळे जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत.

महसूल अधिकाऱ्यांना दोन अधिकार आहेत जमिनीविषयक अधिकार आणि कार्यकारी दंडाधिकारी. हे दोन अधिकार एकाचा पदाला असतात हे भूमाफियांना माहित झाल्याने ते त्याचा गैरफायदा घेतात. आणि लोकांची आर्थिक फसवणूक करतात. सर्वसामान्यांना विविध केसेसमध्ये अडकवून त्यांची फसवणूक भूमाफिया करतात.

तसेच कमी किमतीत लोकांना जमिनी विकायला लावणे किंवा विशेष परिस्थितीत एखाद्याचा खून करणे, असे प्रकार भूमाफिया करत असल्याचे आमच्या लक्षात आले. याबाबत आम्ही सखोल चौकशी केल्यानंतर कळले की महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा गैरवापर भूमाफिया करत आहेत.

महसूल अधिकाऱ्यांचे कार्यकारी दंडाधिकारी पद काढण्यात यावे

भूमाफिया हे महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य गोरगरिबांची जमीन लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता महसूल अधिकाऱ्यांचे कार्यकारी दंडाधिकारी हे पद काढून घ्यावे. त्यांना फक्त जमिनीचे अधिकार द्यावेत, जेणेकरून भूमाफियांना गैरव्यवहार करणे अतिशय कठीण होईल, असे झाले तर भूमाफियांचा खात्मा होऊ शकतो म्हणून पोलीस महासंचालकांना देण्यात आल्यात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रात महसूल अधिकारी हे बॉम्ब (Bomb) आणि आरडीएक्ससारखे (RDX) आहेत, असा उल्लेख असल्याचे पत्रकारांनी विचारले. यावर ते म्हणाले की, बॉम्ब (Bomb) म्हणजे महसूल यंत्रणा आहे जी महसूल क्षेत्रात काम करतात. महसूल अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार म्हणजे आरडीएक्स (RDX) आहेत. डेटोनेटर म्हणजे अधिकाऱ्यांकडे असलेले कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार आहेत.

महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; ‘हे’ आहे कारण

आरडीएक्स आणि डेटोनेटर (Detonator) जेव्हा मिळतात तेव्हा बॉम्ब तयार होतो. मात्र हे बॉम्ब चुकीच्या हातात जाऊ नये, असे मी पत्रात नमूद केलेले आहे. हे बॉम्ब भूमाफिया स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. त्यामुळे डेटोनेटर काढून वेगळा करावा. कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार जर पोलीस आयुक्तांकडे ठेवले भूमाफियांना दोघांशी संगनमत करता येणार नाही. यामुळे लोकांची जमीन हिसकावली जाणार नाही आणि भूमाफियाची आपोआप समाप्ती होईल, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या