दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती, गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक

दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती, गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक

मुंबई

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police) सहा दहशतवाद्यांना अटक (terrorist arrest) केली आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी एक हा मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली. दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यावर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची (mumbao local) रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती, गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन (mumbai connection)समोर आलं आहे. हे दहशतवादी उत्तरप्रदेशातील निवडणुका आणि मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दहशतवाद्यांना मुंबईतून पैसा पुरवला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनंतर स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संध्याकाळी पोलीस दल आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक देखील बोलावली आहे.

दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिग करण्यात आलं होतं. हा पैसा हवालामार्फत पुरवला गेला होता. जान मोहम्मद शेख हा हवाला रॅकेट पाहत होता आणि तो अंगडीयांच्या संपर्कात होता. स्लिपर सेलला पैसे देणे, दहशतवादी कृत्याकरता लागणा-या सामग्री करता पैसे देणे याकरता हा या पैशांचा वापर केला जात होता.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केली होती. ऐन सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती. याशिवाय देशात विविध ठिकाणी याआधीच स्फोटकं पाठविण्यात आलेली असल्याची शक्यताही चौकशीतून व्यक्त करण्यात आली आहे. एका दहशतवाद्याला मुंबई-दिल्ली रेल्वेचं तिकीट काढून देणाऱ्यालाही एटीएसनं ताब्यात घेतलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com