मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

पुणे | प्रतिनिधी | Pune

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे मंत्रालयासमोर विष (poison) प्राशन केलेल्या महिलेचा अखेर दुर्देवी मृत्यू झाला आहे.

विष प्राशन केलेल्या संगीता डवरे यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. डवरे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात (Mantralaya) विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्याने धीरेंद्र शास्त्री अडचणीत!

संगीता डवरे (Sangeeta Dware) यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या पतीवर व्यवस्थित उपचार केले नव्हते.

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
GT vs DC : गुजरात-दिल्ली आज आमनेसामने

त्यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी घेऊन डवरे या मंत्रालयात पोहचल्या होत्या. या संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने त्यांनी मंत्रालयातच विषप्राशन केले होते. या घटनेनंतर पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospitals) उपचारादरम्यान त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.

सरकारदरबारी वेळोवेळी खेटे घालूनही हाती निराशाच आल्यामुळे संगीता डवरे यांनी 27 मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच दिवशी दोन अन्य वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला गेला होता.

एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. संगीता यांच्याव्यतिरिक्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांमध्ये बीड येथील शीतल गादेकर आणि पुण्याचे दिव्यांग रमेश मोहिते यांचा समावेश होता. यातील शीतल यांचा त्या दिवशी मृत्यू झाला होता तर संगीता आणि रमेश मोहिते यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान संगीता डवरे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मात्र; सामान्य व्यक्तीला अशा पद्धतीने केवळ न्याय मिळत नाही म्हणून मंत्रालयासमोर टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही चिंतेची बाब आहे. अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com