Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशVideo : डॉक्टरांशी बोलतांना पंतप्रधान झाले भावूक, म्हणाले...

Video : डॉक्टरांशी बोलतांना पंतप्रधान झाले भावूक, म्हणाले…

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. त्यांच्या भावना अनावर झाल्या. ते म्हणाले, ‘ कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावले आहे.’ हे बोलताना मोदींचा हुंदका दाटला.

- Advertisement -

यावेळी मोदी म्हणाले, “मी वाराणसीचा (काशी) सेवक आहे. आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतूक केले. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावले. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो” मोदी यांनी सातव्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सने वाराणसीतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. त्यात ४ डॉक्टर्स व १०० आरोग्यसेवक सहभागी झाले होते.

दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयावर उच्च न्यायालय नाराज, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या