Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशगुजरात पूल दुर्घटना : पंतप्रधान मोदींची दुर्घटनास्थळी भेट, तुटलेल्या पुलाची पाहणी केली

गुजरात पूल दुर्घटना : पंतप्रधान मोदींची दुर्घटनास्थळी भेट, तुटलेल्या पुलाची पाहणी केली

गांधीनगर | Gandhinagar

गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत १३५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

मोरबी दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवीही होते आणि त्यांनी अपघाताची माहिती मोदींना दिली.

या पूल दुर्घटनेत आतापर्यंत १३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी पुन्हा एकदा मच्छू नदीत मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या