
मुंबई | Mumbai
मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांबरोबरच वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी हे महिनाभरात म्हणजे उद्या (दि.१०) रोजी मुंबईत येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी 'वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) दोन मार्गांना हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. तसेच मोदींच्या हस्ते सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईतील ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नव्या परिसराचे उद्घाटन (Opening) होणार आहे.
दरम्यान, मोदींच्या या कार्यक्रमासाठी मुंबईत पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मरोळ परिसरात (Marol Area) मुंबई पोलिसांच्या १००० जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यामध्ये पाच डीसीपी, २०० अधिकारी आणि ८०० अंमलदारांचा समावेश आहे.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुपारी २.१० मिनिटांनी मुंबई विमानतळावर आगमन होईल.
मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती जाणार.
दुपारी २.४५ वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
प्लॅटफॉर्म १८ वर दोन मिनिटांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारतच्या ट्रेनकडे चालत जातील.
वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत ७ मिनिटे मोदी गप्पा मारतील.
वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. यासंदर्भात १ मिनिटांचे प्रेझेंटेशन मोदींना दिले जाईल.
प्लॅटफॉर्म १८ वरून वाहनाच्या दिशेने २ मिनिटात पोहोचतील व त्या ठिकाणाहून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील.
सीएसएसटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर १८ वरती साधारणता १५ मिनिटांचा कार्यक्रम होईल.
सीएसटीवरून ३.५५ ला आयएनएस शिक्रावरती दाखल होतील व त्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना होतील.
दुपारी ४.२० मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील.
मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत.
मरोळ येथील कार्यक्रमाला ४.३० वाजता पोहचतील,
ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसचे उद्घाटन होईल.
मरोळहून कारने मुंबई विमानतळावर ५.५० मिनिटांनी दाखल होतील.
मुंबई विमानतळावरून ६ वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.