इंधन दरांवरुन मोदींनी बिगर भाजपशासित राज्यांना सुनावलं; म्हणाले...

इंधन दरांवरुन मोदींनी बिगर भाजपशासित राज्यांना सुनावलं; म्हणाले...

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन बिगर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'काही राज्यांनी त्यांच्या नागरिकांना फायदा दिला नाही आणि पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी न करुन महसूल मिळवला. जागतिक संकटात केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज आहे.'

तसेच, 'जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होते. मात्र अनेक राज्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी वॅट कमी करुन नागरिकांना फायदा दिला नाही. परिणामी त्या राज्यातील इंधनाचे दर हे कर कमी केलेल्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत,' असं मोदी म्हणाले. राज्यांच्या करांमुळे देशात काही ठिकाणी इंधनासाठी अधिक पैसावे मोजावे लागणं अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.