प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी वास्तू ; पंतप्रधानांच ट्विट,नव्या संसद भवनाचा हा खास व्हिडीओ

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी वास्तू ; पंतप्रधानांच ट्विट,नव्या संसद भवनाचा हा खास व्हिडीओ

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाच्या दोन दिवस आधी सरकारने संसदेचा पहिला व्हिडिओ जारी केला आहे. संसदेच्या या नव्या इमारतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ट्वीट करून म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये नवीन संसदेची भव्यता आणि सौंदर्य दिसत आहे. भारत सरकारने जारी केलेल्या या १.४८ सेकंदाच्या व्हिडिओत संसदेची इमारत आणि दोन्ही सभागृह दाखवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले की, नवीन संसद भवनाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. हा व्हिडिओ या प्रतिष्ठित इमारतीची झलक देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की, नव्या संसद भवनाचा हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या व्हॉइस-ओव्हरने शेअर करा. यातून तुमचे विचार व्यक्त होतील. मी त्यापैकी काही री-ट्विट करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

या व्हिडीओमध्ये संसद इमारतीच्या आतील तसेच बाहेर भाग देखील दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राजसभा आणि लोकसभा सभागृह सर्व कोनातून दाखवण्यात आलेत. हा व्हिडीओ पाहाताना तुम्हाला संसदेत गेल्याचा अनुभव येतो.

१२२४ खासदार बसतील एवढी या आसनक्षमता नवीन संसदेची आहे. ६४,५०० वर्ग मीटर एवढ्या भव्य परिसरात हे संसद भवन उभे राहिले आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती टाटा समुहाने या इमारतीचे निर्माणकार्य केले आहे. चार मजली या इमारतीच्या निर्माणासाठी ९७० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

कशी असणार नवीन आहे वास्तू

नवीन संसदेत ग्रंथालय, संग्रहालय, भोजन कक्ष देखील असणार आहे. त्यासोबत भारताच्या प्राचीन इतिहासाचेही दर्शन तुम्हाला येथे होणार आहे. महिला आणि आदिवासी क्रांतिकारकांचीही झलक संसदेत पाहायला मिळणार आहे. महत्मा गांधी आणि आतापर्यंतच्या पंतप्रधानांची तैलचित्रे येथे लावण्यात आली आहेत.

या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील.

नवीन संसद निर्माण, जुन्या संसदेची दुरुस्ती आणि देखभाल याशिवाय वारसास्थळ वास्तूंची दुरुस्ती या संपूर्ण प्रोजेक्टला सेंट्रल व्हिस्टा हे नाव देण्यात आले आहे. याचे एकत्रित बजेट १३,५०० कोटी रुपये आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com