Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापंजाबमधील सुरक्षेतील गंभीर त्रुटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना...”

पंजाबमधील सुरक्षेतील गंभीर त्रुटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना…”

दिल्ली | Delhi

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांची सभा होणार होती, मात्र अखेरच्या क्षणी तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. रॅली रद्द करण्यामागे पावसाचे कारण असल्याचे मानले जात होते, मात्र आता त्यामागे सुरक्षेचे (pm securities)कारण असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सुरक्षेतील गंभीर त्रुटी: शेतकरी आंदोलकांनी रोखला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग

गृहमंत्रालयाच्या (home minister) वतीने एक निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब (panjab)सरकारकडूनही उत्तर मागवण्यात आले आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही भटिंडा विमानतळावर पोहोचले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे पंतप्रधान मोदी खूप संतापले आहेत.

भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”. पंतप्रधान मोदी भटिंडा विमानतळावर परतत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना हा संदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी स्पष्टपणे पंजाबचे मुख्यमंत्री चन्नींवर निशाणा साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या