Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजेवढा चिखल फेकाल तेवढंच...; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

जेवढा चिखल फेकाल तेवढंच…; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

नवी दिल्ली | New Delhi

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून अधिवेशन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल लोकसभेत (Loksabha) विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज राज्यसभेत देखील मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा

पंतप्रधान मोदी हे आज राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या (President) अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. तर विरोधी बाकावरील राज्यसभा सदस्यांनी ‘मोदी-अदाणी भाई भाई, जी फॉर जेपीसी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांनी (opposition) घोषणांनी सभागृह दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी मोदी म्हणाले की, जेवढा चिखल फेकाल तेवढंच कमळ चांगलं फुलेल. कमळ फुलवण्यात विरोधकांचे मोठं योगदान आहे. मागच्या ६० वर्षात काँग्रेसने (Congress) खड्डेच खड्डे केले होते. तसेच मागील ९ वर्षात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.अडचणींपासून आम्ही पळणारे नाहीत, त्यावर उपाय शोधणारे आहोत. देशाच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच कायमची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसकडून पटोलेंना ‘ना-ना’?

तसेच पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, खर्गेजी फक्त कर्नाटकमध्ये (Karnataka) एक कोटी ७० लाख जनधन बँक खाती उघडली आहेत. इतकेच नाही तर त्यांच्याच कलबुर्गीमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत. इतकी बँकेची खाती उघडली असतील, लोक इतके जागृत होत असतील तर इतक्या वर्षानंतर कुणाचे खाते बंद होत असेल तर काय करायचे असा टोला मोदींनी खर्गेंना लगावला.

ट्विटरचे बहुचर्चित ‘ब्ल्यू टीक’ फिचर भारतात लॉन्च; ‘या’ सुविधा मिळणार

- Advertisment -

ताज्या बातम्या