
नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर संसदेत संबोधन केले. यावेळी मोदी यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीला जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला...
यावेळी मोदी म्हणाले की, माझं सौभाग्य आहे की मला यापूर्वीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलण्याची संधी मिळाली होती. मात्र, यावेळी मी धन्यवादासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदनही करु इच्छित आहे. राष्ट्रपती महोदयांनी आदिवासी समाजाचा गौरव तर वाढवलाच. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी समाजाचा गौरव वाढत असून आत्मविश्वास देखील वाढत आहे. त्यामुळेच हे सभागृह आणि संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है' अशा शब्दात त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
तसेच विरोधी पक्षांवर हल्लाबोल करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही लोकांना हार्वर्ड अभ्यासाची (Study) मोठी क्रेझ आहे. हार्वर्डमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन हा या अभ्यासाचा विषय आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर (Congress) पलटवार केला. यावेळी त्यांनी दुष्यंत कुमार यांच्या गझलमधील 'तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं, या दोन ओळी देखील वाचल्या.
ते पुढे म्हणाले की, २००४ ते २०१४ हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील घोटाळ्यांचे (Scams) दशक आहे. यूपीएच्या याच १० वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (Kashmir to Kanyakumari) भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत राहिले. त्यांच्या काळात देश सुरक्षित नव्हता. तसेच या काळात भारताची अर्थव्यवस्था देखील ढासळली. त्यामुळे महागाई (inflation) दोन अंकी राहिली. याशिवाय त्या १० वर्षांत भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की कोणीही ऐकायला तयार नव्हते. प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर करणे ही यूपीएची ओळख बनली आहे. जेव्हा तंत्रज्ञानाचे युग खूप वेगाने वाढत होते. त्याचवेळी ते 2G मध्ये अडकून राहिले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. सीडब्लूजी घोटाळ्याने संपूर्ण देश जगात बदनाम झाल्याचे मोदींनी म्हटले.