Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याPM Modi Speech On No Confidence Motion : "विरोधक नो बॉल फेकतात...

PM Modi Speech On No Confidence Motion : “विरोधक नो बॉल फेकतात आणि आम्ही…”; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रातील मोदी सरकारविरोधात (Modi Government) विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून या प्रस्तावावर दोन दिवस वादळी चर्चा झाली. त्यानंतर आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा तिसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला…

- Advertisement -

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणण्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. देशाच्या कोटी-कोटी लोकांचे आभार मानतो. देव खूप दयाळू आहे. तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इच्छा पूर्ण करुन घेतो. मी याला देवाचा आशिर्वाद मानतो की त्यांनी अविश्वास ठराव आणला. २०१८ ला देखील देवाचा आदेश होता. तेव्हाही अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा मी म्हटले होते हा प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही. जनेतेने पूर्ण विश्वासाने विरोधकांसाठी नो कॉन्फिडंन्स घोषित केले. निवडणुकीत एनडीए आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. २०२४ च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा येणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.

No Confidence Motion : “भाजप सरकारने भारताला…”; निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले मत मांडले आहे., विरोधकांनी मात्र याचं गांभीर्य पाळले नाही. विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना लोकांपेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता आहे. विरोधकांना जनतेच्या भूकेची चिंता नाही, त्यांच्या राजकारणाची चिंता आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी कामकाजाच सहभाग घेतला असता तर चांगले झाले असते. गेल्या काही दिवसांत या सभागृहाने अनेक महत्त्वाची विधेयके पारित केली. त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक होती. पण राजकारण विरोधकांसाठी प्राधान्याची बाब होती. त्या विधेयकांमध्ये विरोधकांना रस नव्हता. देशाच्या जनतेने ज्यासाठी त्यांना इथे पाठवले, त्या जनतेचाही विश्वासघात करण्यात आला, असेही मोदी यांनी म्हटले.

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

मोदी पुढे म्हणाले की, “या अविश्वास प्रस्तावात काही अशा विचित्र गोष्टी दिसून आल्या की, सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे बोलण्याच्या यादीत नावचं नव्हते. मागची उदाहरणे पाहा १९९९ मध्ये वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला त्यावेळी शरद पवारांनी डिबेटचे नेतृत्व केले. २००३ मध्ये पुन्हा वाजपेयींचे सरकार होत तेव्हा सोनिया गांधींनी चर्चेचे नेतृत्व केले. त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यानंतर २०१८ मध्ये मल्लिकार्जुन खर्गे विरोधकांचे नेते होते.त्यांनी प्रामुख्याने विषय पुढे नेला. पण यावेळी अधिरबाबूंची काय अवस्था झाली. त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. उलट काल अमित शहांनी खूपच जबाबदारीने म्हटले की हे चांगले वाटले नाही, असा टोला यावेळी मोदींनी कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना लगावला.

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ते (विरोधक) तिकडून नो बॉल फेकत आहेत आणि आम्ही इथून शतक ठोकत आहोत. गंमत म्हणजे क्षेत्ररक्षणही आम्हीच करत असून षटकार, चौकारही आम्हीच लगावत आहोत. तसेच विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे. गेल्या तीन दिवसांत विरोधी पक्षांमधील माझ्या मित्रांनी डिक्शनरी शोधून त्यात जितके अपशब्द सापडतील, ते सगळे वापरले. त्यांच्यासाठी सर्वात आवडती घोषणा आहे ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ परंतु यांचे अपशब्दही माझ्यासाठी टॉनिक आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राहुल गांधींवरील ‘फ्लाइंग किस’च्या आरोपाला कॉंग्रेसकडून जशाच तसं उत्तर; भाजप नेत्याचा Video केला शेअर

- Advertisment -

ताज्या बातम्या