संसद हे संवादाचे सक्षम माध्यम - पंतप्रधान मोदी

संसद हे संवादाचे सक्षम माध्यम - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । New Delhi

हा कालखंड स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरे होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू झाले असून अधिवेशनापूर्वी मोदींनी संबोधित केले...

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेचे अधिवेशन हे संवादाचे एक सक्षम माध्यम आहे. मी याला तीर्थक्षेत्र मानतो. खुल्या मनाने संवाद होईल, गरज असेल तर वाद-विवाद होतील. टीका होईल. त्यामुळे सर्व खासदारांना विनंती करतो, येथे गहन चिंतन, चर्चा, उत्तम संवाद करुयात. सदनाला जेवढे उत्पादक बनवू, सार्थक बनवता येईल, तेवढे बनवू. सर्वाच्या प्रयत्नांतून संसद चालते. सदनाची गरीमा वाढवण्यासाठी आपण कर्तव्य बजावत या सत्राचा राष्ट्रहितासाठी सर्वाधिक उपयोग करू. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले, लोक शहीद झाले. त्यांचे स्वप्न लक्षात घेत सदनाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग व्हावा, अशी अपेक्षा करतो असेही ते म्हणाले.

दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे. यात पहिला मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने (Central Government) नुकतीच असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष संतप्त आहेत. तसेच केंद्र सरकारकडून ईडीच्या (ED) माध्यमातून विविध राज्यांतील विरोधी नेत्यांविरोधात सुरु असलेली कारवाई, केंद्राची अग्निपथ योजना (Agneepath Scheme) महागाई (inflation) भारताच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला, चीनची भारतीय सीमांतर्गत घुसखोरी यासह महाराष्ट्रातील सरकारची उलथापालथ आदी विषयांवर सरकारला धारेवर धरले जाऊ शकते. तसेच १८ जुलै १२ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात ३२ प्रस्ताव आणि बिले सभागृहात चर्चेसाठी येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com