Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमोदींनी पुन्हा सांगितले कृषी विधेयकाचे फायदे

मोदींनी पुन्हा सांगितले कृषी विधेयकाचे फायदे

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Prime Minister Narendra Modi यांनी सोमवारी पुन्हा एकदा कृषी विधेयकाचे फायदे सांगितले. बिहारमधील एका कार्यक्रमात बोलतांना कृषी विधेयकावर अफवा पसरवणाऱ्यांवर जोरदार टीका करत कृषी विधेयकाचे फायदे सांगितले.

- Advertisement -

शेती विधेयक रविवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला होता. राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयक अवाजी मतदानाने मंजूर झाले.

कुठेही माल विकता येणार

सोमवारी बोलतांना मोदी म्हणाले, देशातील शेतकऱ्यांना नवीन अधिकार देणारा कायदा संसदेने केला आहे. मागील कायद्यामुळे शेतकरी बांधला गेला होता. शेतकऱ्यांच्या मागे लपून काही मोठ्या शक्ती त्यांचा छळ करत होत्या. आता नवीन कायद्यामुळे शेतकरी आपला शेतमाल कुठेही विकू शकेल. त्याला कोणत्याही अटी नसतील.

शेतकऱ्यांना जास्त मोबदला

मोदी म्हणाले की, ज्या प्रदेशात बटाटे जास्त झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला. जून महिन्यात शेतकऱ्यांना हा जास्त दर मिळाला. मध्य प्रदेश व राजस्थानमधील तेल मिल सरळ शेतकऱ्यांशी तेलबिया घेत आहे. त्यात २० ते ३० टक्के अधिक दर मिळाला. ज्या भागात कडधान्य जास्त होते, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अधिक दर मिळाला.

बाजार समित्यांचे काय होणार?

पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात बाजार समित्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. बाजार समित्या कायम राहणार आहेत. बाजार समित्या बंद होणार हा अपप्रचार काही जणांकडून होत आहे. शेतकऱ्यांमध्ये ते संभ्रम तयार करत आहेत. लहान शेतकरी एकत्र आले आणि आपले शेतमाल एकत्र करुन त्यांनी विकले तर त्यांचीही फायदा होईल.

कंपन्यांशी करार केल तर…

काही शेतकऱ्यांनी भातासाठी एका कंपन्यांशी करार केला तर सर्व माल ती कंपनी घेईल. पुर्वी एखाद्या उद्योजकास बटाटे खरेदी करायचा असेल तर तो बाजार समितीतून खरेदी करत होता. आता तो सरळ शेतकऱ्यांकडे जाऊन खरेदी करेल.

MSP चे काय होणार?

पीएम मोदी म्हणाले, आता शेतकरी आपल्या शेतमालाचे साठवण करु शकेल. पुर्वी त्यास परवानगी नव्हती. शेतमालास आधारभूत किंमत (MSP) कायम राहणार आहे. जे लोक हा भ्रम तयार करत आहे त्यांनी स्वामीनाथन कमेटीचा अहवाल दाबून ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या