Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभारत जोडो यात्रेदरम्यान ‘मोदी-मोदी’च्या घोषणा; राहुल गांधी, म्हणाले...

भारत जोडो यात्रेदरम्यान ‘मोदी-मोदी’च्या घोषणा; राहुल गांधी, म्हणाले…

नवी दिल्ली |New Delhi

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानमध्ये (Rajasthan)आहे. यावेळी यात्रेदरम्यान अचानक मोदी-मोदी अशी घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे…

- Advertisement -

राजस्थानमधील खेल संकुल (Sports Complex) येथून राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला सोमवारी (दि.५) रोजी सकाळी सुरुवात झाली होती. त्यानंतर ही यात्रा आज सकाळी झालवार या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ झाली. त्यावेळचा हा व्हिडीओ असून राहुल गांधी यांनी हातवारे करत आणखी जोराने घोषणा द्या,असे सांगितल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी घोषणा देणाऱ्यांकडे पाहून फ्लाईंग किसही दिला.

दरम्यान, यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) गोविंद सिंग दातास्रा, सचिन पायलट आणि इतर काँग्रेस मंत्री व आमदार (MLA) उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या