आईचा १०० वा वाढदिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आई हिराबेन यांना दिले अनोखे गिफ्ट

आईचा १०० वा वाढदिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आई हिराबेन यांना दिले अनोखे गिफ्ट

नवी दिल्ली । New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांचा आज १०० वां वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच मोदींनी आपल्या आईची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मोदींनी आईची भेट घेतल्याचे फोटो ट्विटरवरुन (Twitter) पोस्ट केले आहेत...

पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोंना एक छान कॅप्शनही दिली आहे. “आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसत आहे. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.

तसेच याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी ११ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास आपल्या आईची त्यांच्या अहमदाबाद (Ahmedabad) इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. त्यामुळे मार्च महिन्यातील ही भेट दोन वर्षांमधील पहिलीच भेट ठरली होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यात गौरव अभियानादरम्यान (Gaurav Abhiyan) १६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा ३५७ किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय, ८१ किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि १६६ किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com