Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशPM Narendra Modi LIVE : देशात लॉकडाऊन लागणार नाही

PM Narendra Modi LIVE : देशात लॉकडाऊन लागणार नाही

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi live) यांनी आज देशाला संबोधित केले. देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून विविध घटकांशी चर्चा करत आहेत. त्यांनी लस उत्पादन कंपनीशी चर्चा केली.

- Advertisement -

जगातील सर्वात स्वस्त भारताने दिली आहे. देशात आतापर्यंत 12 कोटी लसींचे डोस दिले गेले आहे. त्यात कोरोना योद्धा, आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठांचा सहभाग आहे. कालच 18 वर्षांवरील व्यक्तीला लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी आपल्या भाषणात म्हणाले,

दवाई भी कडाई

देशाला लॉकडाऊनपासून देशाला वाचवायचे आहे. राज्यांनाही मी विनंती करेल, लॉक़डाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरा. आपणास देशातील नागरिकांना वाचवायचे आहे आणि देशाला वाचवायचे आहे. यामुळे गरज नसतांना बाहेर पडू नका. उद्या रामनवमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा संदेश हाच आहे, आपण मर्यादेत राहावे. कोरोना नियमांचे पालन करावे. रमजानच्या पवित्र महिन्याचा ७ वा दिवस आहे. रमजान धैर्य, अनुशासनाची शिकवण देते. पण दवाई भी कडाई भी हा मंत्र कायम ठेवा.

संकट मोठे आहे पण…

संकट मोठे आहे, पण आपल्याला हे संकट विश्वासाने पार करायचे आहे. सर्व डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, सुरक्षा रक्षक या सर्वांनी आपलं आयुष्य पणाला लावून जीव वाचवले. या लाटेतही त्यांनी आपली चिंचा, आपले कुटुंब सोडून सेवा सुरुच ठेवली आहे. कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. जो त्रास तुम्ही सहन केला, जो त्रास तुम्ही सहन करत आहात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे.

“कोरोना विरोधात देश आज पुन्हा एक मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती सुधारली होती. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. जे तुम्ही सोसत आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या लोकांनी आपल्या माणसाला गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परिवाराचा एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न

आपल्या शास्त्रात म्हटले आहे की, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको. कोणत्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर पूर्णपणे संवेदनशीलपणे काम केले जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सैनिकांनाही लस मिळेल

सैनिक ज्या शहरात आहेत त्यांना त्याच ठिकाणी लस मिळेल आणि त्यांचे कामही बंद होणार नाही. लसीकरणाचे काम जोरात सुरु आहे. आपला भारत दोन मेड इन इंडिया लसींसोबत जगभरातील मोठे लसीकरण अभियान राबवत आहे. जास्तीत जास्त आणि गरजू लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात अतिशय वेगाने लसीकरण मोहिम सुरु आहे. या लढाईत कोव्हिड वॉरियर, आणि वृद्धांना लस दिली गेली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल. भारतात जी लस बनेल त्याचा अर्धा वाटा थेट रुग्णालय आणि देशाला मिळेल”, असे पंतप्रधान म्हणाले.

देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या