video नाशिक, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

एक लस वाया जाऊ देऊ नका, कोरोनावर गावागावात जागृती करा
video नाशिक, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

नाशिक । Nashik

करोनाचा वाढता संसर्ग बघता देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे अशा देशातील ५६ जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधला. यात महाराष्ट्रातील नाशिक, नगरसह १७ जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशातील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चिंताजनक असून दिवसाला तीन ते चार लाख इतके पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. यामुळे गुरुवारी सकाळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त सहभागी झाले.

मोदी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतांना म्हणाले, कोरोनाच्या या युद्धात जिल्हापातळीवरील तुम्ही सर्वात मोठे योद्धा आहेत. शंभर वर्षात आलेल्या या महामारीच्या काळात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रुचा वापर करुन तुम्ही चांगल्या पद्धतीने परिस्थितीला सामोरे गेले. एक लस वाया जाऊ देऊ नका, कोरोनावर गावागावात जागृती करा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com