Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींचे सिडनीत अनोख्या पद्धतीने जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सिडनीत अनोख्या पद्धतीने जंगी स्वागत

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दाखल झाले असून ते तीन दिवस ऑस्ट्रेलियात थांबणार आहेत. यावेळी ते राजधानी सिडनीत (Sydney) वास्तव्यास असणार आहेत….

- Advertisement -

पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियात हवेत welcome modi अशी अक्षरे लिहिलेला एक व्हिडिओ शेअर करून स्वागत करण्यात आले. तसेच हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला असून तो लाइक केला आहे. तर यावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होताच हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञान कंपनी फोर्टेस्क्यु फ्यूचर इंडस्ट्रीजच्या कार्यकारी अध्यक्षांची भेट घेतली. तसेच त्यांनी सिडनीत प्रमुख कंपन्यांच्या व्यावसायिकांची देखील भेट घेतली. यावेळी त्यांनी तंत्रज्ञान, कौशल्य आणि हरित ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताचा सहभाग वाढवण्याचे आश्वासन दिले.

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

पंतप्रधान मोदी या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. याशिवाय ते भारतीयांकडून आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारचे पाहुणे या नात्याने मोदी हा दौरा करत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी परदेशी गुंतवणुकीसाठी भारत जगातील सर्वात आवडती अर्थव्यवस्था आहे असे सांगितले. तसेच भारतात गुंतवणूक करण्यासाठी ऑस्ट्रेलियन उद्योजकांना मोदींनी आमंत्रण दिले आहे.

मैं निकला गड्डी लेके…; राहुल गांधींची ट्रकने सवारी, Video Viral

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेशी दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांचं कौतुक केले आहे.तसेच त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या