Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याRepublic Day 2023 : पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा; म्हणाले...

Republic Day 2023 : पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा; म्हणाले…

देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासीयांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण हा प्रजासत्ताक दिन आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजरा करत आहोत. देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्नं साकार करण्यासाठी आपण एकत्रितपणे वाटचाल करुयात हीच माझी इच्छा आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर दिल्लीत NCC-NSS कॅडेट्स यांच्यासह प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या देशभरातील तरूण कलावंताना एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मित्रांनो भविष्यासाठी मोठी ध्येय आणि संकल्प हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. मात्र याचबरोबर आपल्याला वर्तमानातील छोट्या-मोठ्या प्राथमिकतानांही तेवढच महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे माझा तुम्हा सर्वांना आग्रह असेल, की देशात होणाऱ्या बदलांची तुम्हाला माहिती असू द्या, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात जे नवनवीन अभियान राबवले जात आहेत, त्यात तुम्ही सहभाग घ्या. स्वच्छ भारत अभियानाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. तुम्ही तरुणांनी याला आपल्या आयुष्याचं मिशन बनवलं पाहिजे. तुमच्याकडे कौशल्यही आहे आणि उत्साहही आहे. तुम्ही संकल्प करू शकतात की आम्ही आमच्या मित्रांना सोबत घेऊन आमचं गाव, शहरास स्वच्छ बनवण्यासा कायम कार्यरत राहू. जेव्हा तुम्ही स्वच्छतेसाठी बाहेर पडाल, तेव्हा मोठ्या लोकांवर त्याचा जास्त परिणाम होईल, असे मोदींनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या