Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशअमेरिकन संस्थेचा सर्वे : जगभरातील नेत्यांमध्ये मोदीच लोकप्रिय

अमेरिकन संस्थेचा सर्वे : जगभरातील नेत्यांमध्ये मोदीच लोकप्रिय

जागतिक पातळीवरवरील सर्वेक्षणात जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. तब्बल 71 टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळवत मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील ग्लोबल लीडर अप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने (global leader approval tracker Morning Consult)हे सर्वेक्षण केलं आहे. मोदी यांची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझिल, फ्रान्स आणि जर्मनी या 13 देशांमधील नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे

लसीकरण झालेल्यांचे काॅलेज बंद, पण मुलांच्या शाळा सुरु, काय आहे घोळ?

- Advertisement -

ग्लोबल लीडर अप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील 13 मोठ्या नेत्यांचा कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांना 43 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या खालोखाल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक या यादीमध्ये लागलाय. त्रुदो यांनाही 43 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे.मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा क्रमांक असून 41 टक्के लोकांनी मॉरिसन यांना पाठिंबा दिला. या यादीत ज्यांना शेवटचं स्थान मिळालं आहे त्यात 11 व्या स्थानी ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, 12 व्या स्थानी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि 13 व्या स्थानी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत. बोल्सोनारो यांना 37 टक्के, मॅक्रॉन यांना 34 टक्के तर जॉन्सन यांना अवघी 26 टक्के मतं मिळाली आहे.

UIDAI कडून स्पष्टीकरण : असे आधार कार्ड ठरणार बिनकामाचे

कशी होती पद्धत

मॉर्निंग कन्सल्टच्या मालकीची पॉलिटिकल इंटेलिजन्स ही निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट जागतिक स्तरावर 11 हजारहून अधिक मुलाखती घेते आणि अमेरिकेतील ५ हजार नोंदणीकृत मतदारांच्या अध्यक्षीय निवडणुकांबद्दल मुलाखती घेते. भारतात सर्वेक्षणात सहभागी केल्या जाण्याऱ्या लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातात. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश, शिक्षण आणि काही विशिष्ट देशांमध्ये अधिकृत सरकारी स्त्रोतांवर आधारित सर्वेक्षण केले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या