Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याUnion Budget 2023 : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया,...

Union Budget 2023 : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मोदी सरकारचा (Modi Government) हा एकूण नववा तर येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प होता.

- Advertisement -

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकरी आणि आयकरच्या रचनेत बदलासंदर्भात सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या टीमला या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी शुभेच्छा देतो. यंदाचा अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा असून कोट्यावधी नागरिकांचे आयुष्य बदलणारा आहे. या अर्थसंकल्पातून ग्रामीण शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होणार असून शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा अर्थसंकल्प असल्याने गरिबांचं स्वप्न पूर्ण करणारा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सरकारने भारतातील महिलांचे (Women)आयुष्य सोपं करण्यासाठी अनेक पावलं उचलली. त्यामुळे महिला बचत गट (Women’s self-help Group) हे एक सामर्थ्यशाली क्षेत्र भारतात पसरू लागले आहे. तसेच त्यांना थोडंसं पाठबळ मिळालं, तर त्या जादू करून दाखवू शकतात. त्यामुळे महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात नवी तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी विशेष बचत योजना सुरू केली जात असून या योजनेमुळे सामान्य महिलांना मोठी ताकद मिळणार आहे. त्याचबरोबर हा अर्थसंकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना (Farmers) सक्षम करणारा असून प्रत्येक क्षेत्रात आपण अधुनिकतेची कास धरायला हवी, असे मोदींनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या