पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) दोन हस्तक मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश वाहतुक पोलिसांना (Police) व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशकात आढळले गोवरचे 'इतके' संशयित रुग्ण

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वाहतुक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) हेल्पलाईनवर काल (दि.२१) रोजी एक संबंधित व्हॉट्सअॅप संदेश प्राप्त झाला होता. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होता. त्या संबधित व्यक्तीने दावा केला होता की,''अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मुस्तफा अहमद व नवाज हे असून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या (Murder) करण्याचा कट आखत आहेत. तसेच हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्याने म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पिंपळगावमधील महिलेने 'अशी' फुलविली गच्चीवर बाग; पाहा व्हिडीओ

यानंतर पोलिसांनी (Police) संबधित व्यक्तीचा कसून तपास केला असता तपासाअंती असे आढळून आले की, व्हॉट्सअॅपद्वारे संदेश करणारा व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यानंतर वर्षभरापासून तो बेरोजगार होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
Video : चांदवडच्या विकासाला हवंय तरी काय?

दरम्यान, या संबधित व्यक्तिवर पोलिसांनी कोणती कारवाई केली यासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती समोर आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास (Investigation) पोलीस करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
Video : आरोग्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा - डॉ.कुंभार्डे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com