मोदी देवालाही समजवू शकतात; राहुल गांधींचा टोला

मोदी देवालाही समजवू शकतात; राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी अमेरिकेला पोहोचले आहेत. राहुल गांधी(Rahul Gandhi) सहा दिवस अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये (San Fransisco) त्यांनी भारतीयांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. तसेच देशातील राजकारणासंदर्भातही त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही टोला लगावला." भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रह्मांडात काय चाललं आहे हे देवालाही समजवू शकतात असं म्हणत त्यांनी हा टोला लगावला आहे.राजकारणासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत."

मोदी देवालाही समजवू शकतात; राहुल गांधींचा टोला
क्रूरतेची परिसीमा गाठली! आधी चाकूचे ४० वार, नंतर दगडाने ठेचून १६ वर्षीय प्रेयसीला संपवलं

राहुल गांधी म्हणाले की, "जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे. हा एक आजार आहे की भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहीत आहे. मला वाटतं की त्यांना देवापेक्षा जास्त माहिती आहे. ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे ते समजावून सांगू शकतात. पंतप्रधान मोदी देखील त्यापैकी एक आहेत."

ते वैज्ञानिकांना विज्ञानाविषयी आणि इतिहासकारांना इतिहासाविषयी समजवू शकतात. युद्ध कसं करायचं ते लष्कराला शिकवू शकतात. आकाशात विमानांनी भरारी कशी घ्यायची ते वायुदलाला समजावू शकतात. अगदी काहीही कुणालाही समजावू शकतात. पण मुळात असे आहे की त्यांना काहीही माहित नाही. कारण आयुष्यात तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर तुम्हाला आधी ऐकून घ्यावे लागते.

मोदी देवालाही समजवू शकतात; राहुल गांधींचा टोला
अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी ड्रोनद्वारे पकडला, जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

आम्ही जेव्हा भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केली होती तेव्हा पाच ते सहा दिवसांमध्ये आम्हाला हे कळलं होतं की हजारो किमीची ही यात्रा करणं सोपं काम नाही. कॉलेजच्या दिवसांमध्ये मला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं.

मात्र आम्ही रोज २५ किमी चालत होतो. तीन आठवडे जेव्हा संपले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्हाला थकवा जाणवत नाही. कारण आमच्या मनात ही भावना होती की संपूर्ण भारत आमच्याबरोबर चालतो आहे. लोकांचं प्रेम मिळतं तेव्हा थकवा निघून जातो. भारत जोडो यात्रेत आम्ही प्रेम, आपुलकी आणि मैत्री हेच पसरवण्याचं काम केलं असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com