Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशदुसऱ्या टप्प्यात मोदींसह मुख्यमंत्र्यांचे लसीकरण

दुसऱ्या टप्प्यात मोदींसह मुख्यमंत्र्यांचे लसीकरण

नवी दिल्ली

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक व्हिव्हिआयपींना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु आहे. यात ७ लाखांपेक्षा जास्त कोरोना युद्धांना लस दिली गेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जात आहे, अशांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच लष्करातील जवानांनाही लस देण्यात येणार आहे.

सीरम संस्था आणि भारत बायोटेक या दोन मोठ्या संस्थांमार्फत देशात लस निर्मित केली आहे. कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन या नावाने हि लस देशात उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या देशातील कोरोना योद्धयांना ही लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता आणि तशा पद्धतीने लसीकरणास सुरूवात देखील झाली आहे. मात्र पंतप्रधान, राजकीय नेते यांनी लस घेतली नसल्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत सांशकता होती. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यात हे सर्व राजकीय नेते लस घेणार असल्याचे आता समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या