पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

अहमदाबाद। Ahmedabad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, हिराबेन यांनी १८ जून रोजीच त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.

यूएन मेहता रुग्णालय व्यवस्थापनाने मेडिकल बुलेटिन जारी करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com