सुरक्षेतील गंभीर त्रुटी: शेतकरी आंदोलकांनी रोखला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग

सुरक्षेतील गंभीर त्रुटी: शेतकरी आंदोलकांनी रोखला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांची सभा होणार होती, मात्र अखेरच्या क्षणी तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. रॅली रद्द करण्यामागे पावसाचे कारण असल्याचे मानले जात होते, मात्र आता त्यामागे सुरक्षेचे (pm securities)कारण असल्याचे समोर आले आहे. गृहमंत्रालयाच्या (home minister)वतीने एक निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब (panjab)सरकारकडूनही उत्तर मागवण्यात आले आहे. यावर भाजपने सीएम चन्नी यांचा राजीनामा मागितला आहे.

सुरक्षेतील गंभीर त्रुटी: शेतकरी आंदोलकांनी रोखला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग
एसटी महामंडळाचे मोठे पाऊल : ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, पंतप्रधान सकाळी भटींडा येथे पोहोचले होते. त्यानंतर तेथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचे होते. मात्र पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे पंतप्रधानांना आधी 20 मिनिटे थांबावे लागले. मग आकाश निरभ्र नसल्याचं पाहून रस्त्यानं जायचं ठरवलं. त्यासाठी साधारण २ तास लागणार होते. पंजाब पोलिसांच्या डीजीपींना याबाबत माहिती देऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची संमती घेण्यात आली. पंतप्रधानांचा ताफा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापासून ३० किमी अंतरावर असताना वाटेत एक उड्डाणपूल आला. तेथे शेतकरी आंदोलकांनी रास्ता रोको केला. त्या उड्डाणपुलावर पंतप्रधान मोदींचा ताफा १५-२० मिनिटे अडकून पडला होता. गृह मंत्रालयाने ही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे मानले आहे.

सुरक्षेतील गंभीर त्रुटी: शेतकरी आंदोलकांनी रोखला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

गृह मंत्रालयाने सांगितले की, पंजाब सरकारला पंतप्रधानांच्या दौऱ्याची आगाऊ माहिती देण्यात आली होती. हे लक्षात घेऊन पंजाब सरकारने योग्य ते बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था करावी हवी होती. तसेच आकस्मिक होणारा बदल लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिसही रस्त्यावर टाकावे लागले, ते झाले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com