Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यासंसदेत PM मोदींच्या जॅकेटचीच जास्त चर्चा... 'या' आहेत खास गोष्टी

संसदेत PM मोदींच्या जॅकेटचीच जास्त चर्चा… ‘या’ आहेत खास गोष्टी

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे त्यांचा वेश आणि वेगवेगळ्या जॅकेटमुळे (Modi Jacket) नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत पोहोचले. यादरम्यान पीएम मोदींच्या पेहरावाची बरीच चर्चा होत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक विशेष प्रकारचं जॅकेट घालून संसदेत प्रवेश केला. मोदींनी घातलेल्या या निळ्या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याचं कारणही तसंच आहे. हे जॅकेट विशेष ब्रँड किंवा विशेष डिझायनरमुळे चर्चेत नाहीये. तर यासाठी वापरण्यात आलेला कपडा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही-आम्ही ज्या प्लास्टिकच्या बाटल्या एका पाणी पिऊन फेकून देतो, त्याच प्लास्टिकपासून या जॅकेटचा कपडा तयार करण्यात आला आहे. इंडियन ऑइल कंपनीतर्फे नुकतंच हे जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आलं.

इंडियन ऑइल कंपनीने पर्यावरणपुरक योजनेची घोषणा केली आहे. याला ‘अनबॉटल इनिशिएटिव्ह’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून पेट्रोल पंप आणि एलपीजी एजन्सींवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचे जॅकेट बनवण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये एक जॅकेट बनविण्यासाठी २८ प्‍लॉस्‍टिक बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो.

कंपनीने दरवर्षी १० कोटी प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी पाच ते सहा बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. एक शर्ट बनवण्यासाठी 10 बाटल्या तर पँट बनवण्यासाठी 20 बाटल्या लागतात. या प्रक्रियेत प्रथम बाटलीपासून फायबर तयार केले जाते, नंतर त्यापासून सूत, नंतर कापड बनवले जाते आणि शेवटी जॅकेट तसेच तर वस्त्र तयार केली जातात, अशी माहिती कंपनीने सांगितली आहे.

‘ही’ आहेत जॅकेटची खासियत?

– हे जॅकेटला लागणारे कापड पूर्णपणे ग्रीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

– जॅकेट बनवण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या निवासी भागातून आणि समुद्रातून गोळा केल्या आहेत.

– जॅकेटवर एक क्यूआर कोड आहे. तो स्कॅन केल्‍यास जॅकेटची सविस्‍तर माहिती मिळणार आहे.

– रिसायकल पद्धतीने बनवलेल्या या जॅकेटची किंमत ही 2,000 रुपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या