Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रयामुळे मोदींचा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा दौरा निश्चत

यामुळे मोदींचा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा दौरा निश्चत

पुणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. सीरम इन्स्टिट्यूट कोरोनावर लस तयार करत आहे.

- Advertisement -

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला १०० देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.

करोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगातील विविध कंपन्यांमध्ये करोनावरील लस बनविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे.

भारतातील विशेषत: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून त्यांनी चार कोटी डोस तयार केले आहेत. लस तयार झाल्यानंतर तिच्या वितरणासाठी नियोजनाची तयारीही केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरु आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट देऊन सर्व आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु होती. मात्र, मोदींचा येत्या शनिवारचा दौरा निश्चित झाला आहे. त्यांच्या दौऱ्याची प्रशासनकडून जोरदार तयारी सुरु आहे.

दरम्यान, शंभर देशांच्या राजदूत दिनांक २७ नोव्हेंबरला “सीरम” इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार होते परंतु, मोदींच्या दौऱ्यामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला असून आता ते ४ डिसेंबरला सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर शनिवार (दि.२८ ) रोजी सीरमला भेट देऊन आढाव घेणार असल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. गुरूवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधान कार्यालयाकडून मोदी यांच्या दौऱ्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या