Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशजगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला PM मोदींनी दाखवला हिरवा...

जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा; सुविधा अन् भाडे ऐकून हैराण व्हाल

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ जानेवारी) सकाळी वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हिरवा झेंडा दाखवला आहे.

- Advertisement -

‘एमव्ही गंगा विलास’ही क्रूझ ५१ दिवसांत ३२ प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार २०० किमीचा प्रवास करणार आहे. या दरम्यान क्रूझ भारत आणि बांगलादेशातील गंगा, भागीरथी, हुगळी, ब्रह्मपुत्रा आणि वेस्ट कोस्ट कॅनॉल इत्यादींसह २७ नद्यांमधून जाईल. याशिवाय, गंगा विलास सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासह अनेक उद्यान आणि अभयारण्यांमधूनही जाईल.

अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं

देशातील सर्वोत्कृष्ट सुविधा जगासमोर आणण्यासाठी MV गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या ५१ दिवसांच्या प्रवासात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे.

या प्रवासामुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्मात सहभागी होण्याची आणि शानदार प्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे रिव्हर क्रूझची वापरात न आलेली क्षमता उपयोगात येईल. तसेच ही भारताच्या नदी क्रूझ पर्यटनाच्या नवीन युगाची सुरुवात ठरेल.

जिकडे तिकडे बिबटेच बिबटे, सांगा आम्ही शेती करू कशी?; बळीराजाचा आर्त सवाल

या क्रूझमध्ये ५ स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.तसेच मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे. याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर ३१.२९ कोटींचं ड्रग्ज जप्त; ड्रग्ज लपवण्यासाठी असं काही केलं की VIDEO पाहून हादराल

दरम्यान, या प्रवासाठी प्रवाशांना एका दिवसासाठी तब्बल ५० हजार रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे ही क्रूझ आगामी दोन वर्षांसाठी बूक झाली असून प्रवाशांनी बुकींग रद्द केले, तरच वेटींग लिस्टमधील प्रवाशांना तिकीट मिळेल, अशी माहिती अंतारा रिव्हर क्रूझचे मुख्यकार्यकारी अधिकारी राज सिंग यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या