पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : चौकशी करणाऱ्या न्यायमुर्ती इंदू मल्होत्रांना कोणी धमकवले

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : चौकशी करणाऱ्या न्यायमुर्ती इंदू मल्होत्रांना कोणी धमकवले

नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत (PM Modi security breach)गंभीर स्वरूपाची त्रुटी राहिली होती. याप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा (Retired Justice Indu Malhotra) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. आता न्यायमुर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी मिळाली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : चौकशी करणाऱ्या न्यायमुर्ती इंदू मल्होत्रांना कोणी धमकवले
Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले...कोणी राजे आलेत का?

खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी (Khalistan Separatists) त्यांना धमकी दिली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करू देणार नाही, असं सिख फॉर जस्टिस (SFJ) या खालिस्तानी फुटीरतावादी संघटनेनं म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : चौकशी करणाऱ्या न्यायमुर्ती इंदू मल्होत्रांना कोणी धमकवले
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

पंतप्रधान मोदी ५ जानेवारी रोजी पंजाब दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचा ताफा रोखण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून पंतप्रधान माघारी परतले होते. याप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यात एनआयएचे महासंचालक वा त्यांचे प्रतिनिधी (महानिरीक्षक वा त्यावरच्या श्रेणीतील अधिकारी), चंदीगडचे पोलीस महासंचालक, पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सुरक्षा), पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांचा या समितीत समावेश आहे. या समितीच्या प्रमुख इंदू मल्होत्रा यांनाच धमकावण्यात आल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : चौकशी करणाऱ्या न्यायमुर्ती इंदू मल्होत्रांना कोणी धमकवले
काँग्रेसने तिकिट दिलेली ‘बिकनी गर्ल’ अर्चना गौतम कोण आहे?

माजी न्यायमूर्ती मल्होत्रा यांच्यासह अनेक वकिलांना संघटनेनं एक व्हॉइस नोट पाठवली आहे. या व्हॉइस नोटमध्ये म्हटलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या प्रकरणाची न्या. मल्होत्रा यांना करू देणार नाही. त्यांनी पीएम मोदी आणि शिख नागरिक यांच्यापैकी एकाला निवडावे लागेल. याच संघटनेने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकी दिली होती. त्याचा उल्लेखही या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना याबाबत आम्ही बजावले होते. आता त्यांची यादीच आम्ही बनवत आहोत आणि सर्वांना धडा शिकवला जाईल, अशी धमकी या गटाने दिली आहे.

Related Stories

No stories found.