Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशमोदींची मोठी घोषणा : पहिल्या टप्प्यातील लसीचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार

मोदींची मोठी घोषणा : पहिल्या टप्प्यातील लसीचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतंच सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणाबाबत चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीचा सर्व खर्च केंद्र सरकार ‌उचलणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्करला ही लस दिली जाणार आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. कोव्हिन नावाचे डिजीटल अ‍ॅप बनवण्यात आले आहे. आधार कार्डद्वारे याची नोंदणी केली जाणार आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला लस कधी दिली जाईल, याचीही यात माहिती असणार आहे. भारताच्या या पद्धतीला इतर जगभरात फॉलो केले जाईल, असे मोदी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या