हिराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी

हिराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदी यांनी गांधीनगरमध्ये हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यानंतर स्मशानभूमीत मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले.

गुरुवारी मध्यरात्री अचानक हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हिराबेन यांची प्राणज्योत मालवली. हिराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हिराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com