पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोदींनी घेतली राष्ट्रपतींचे भेट : मोठी कारवाई होणार?

पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोदींनी घेतली राष्ट्रपतींचे भेट : मोठी कारवाई होणार?

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी ( pm modi ) आता सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान मोदींनी आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president kovind )यांची भेट घेतली. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोदींनी घेतली राष्ट्रपतींचे भेट : मोठी कारवाई होणार?
पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रूटी, नेमके काय झाले पाहा फोटोमधून

पीएम मोदींनी पंजाब दौऱ्यात राष्ट्रपतींना त्यांच्या सुरक्षेतील अडथळ्यांची संपूर्ण माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दलही राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक झाल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे.

राज्यपालांकडून अहवाल मागवणार?

पंतप्रधानांच्या भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंजाबच्या राज्यपालांकडून घटनेचा अहवाल मागून घेण्याची शक्यता आहे. राज्यपालांचा अहवाल आल्यानंतरच ते पुढील निर्णय घेतील, असंही सूत्रांनी सांगितलं.

पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोदींनी घेतली राष्ट्रपतींचे भेट : मोठी कारवाई होणार?
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्यासमोर मांडण्यात आले. सरन्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेऊ शकतो. वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी या प्रकरणाशी संबंधित जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंग यांनी पंजाब सरकारला योग्य निर्देश देण्याची तसेच घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहणे ही गंभीर चूक असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com