मोदी म्हणाले, लस आली नाही, पण आल्यावरचा प्राधान्यक्रम निश्चित

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीराजकीय

नवी दिल्ली:

"काही लोक कोरोना लशीवरून राजकारण करत आहेत. पण लस कधी येणार हे आपल्या हातात नाही. ते आपण ठरवू शकत नाही. फक्त लस आल्यानंतर कोणाला प्राधान्याने ती दिली पाहिजे याबाबत स्पष्टता आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केले.

करोना लस कधीपर्यंत येणार हे आम्ही ठरवू शकत नाहीत तर हे वैज्ञानिकांच्या हातात आहे', असे मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटले. काही लोक यासंबंधी राजकारण करत आहेत परंतु कुणालाही राजकारण करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना आणि आपल्याच पक्षातील वाचाळ नेत्यांना लगावला.राजकीय वर्तुळात कोरोना लशीसंबंधात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

मोदी म्हणाले, लसीचा डोस, त्याची किंमत अजून काहीच निश्चित नाही. राज्यांनी लसीसाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याची तयारी करावी. आपण लोकांना सर्वोत्तम लस उपलब्ध करुन देऊ.

करोना स्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील सहभागी झाले होते. याशिवाय केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले. मात्र, या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी मात्र सहभाग टाळला. बैठकीत गृहमंत्री अमित शहा हेदेखील सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com