रक्षा-बंधन : बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा सण

रक्षा-बंधन : बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा सण
Rakshabandhan

बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. (Raksha Bandhan) आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाचे संकट असतांनाही बहिण-भावाचा हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे. बहिण-भावांमधील स्नेह, आदर व प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे.

Rakshabandhan
रक्षाबंधन : प्रत्येक क्षणाला सदगुरु आपले संरक्षण करतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन या शुभेच्छा दिलेल्या आहेत. रक्षाबंधनाच्या (Rakhi) दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि त्याने आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असावं आणि त्याला दिर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त अनेक ठिकाणांहून त्यांच्या बहिणी प्रेमापोटी राखी पाठवत असतात. कोरोनाचं संकट उद्भवण्यापूर्वी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी हे अनेक छोट्या मुलींकडून राखी बांधून घेत असत. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट कायम असल्याने हा समारंभ झालेला नाही.

राखी पौर्णिमेचा (Rakhi) सण हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि अतूट विश्वासाचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, बहिणी आणि भाऊ यांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर आणि इतर सोशल मीडियाद्वारे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन विशेष अभिनंदन संदेश पाठवून हा दिवस खास बनवू शकता.

सैनिकांना राख्या

भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी सदैव उभे असणाऱ्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी श्रीरामपूर येथील संस्कार भारती रांगोळी कलाकार सौ. कलावती राधाकृष्ण देशमुख यांनी स्वतः तयार केलेल्या १९५० राख्या लेह, श्रीनगर आणि जम्मू येथे कार्यरत असणाऱ्या भारतीय जवानांसाठी पाठविल्या.

सीमेवरील जवान आणि पुणेकरांमध्ये राखीद्वारे अनोखे बंध तयार झाले असून, त्यासाठी पुणे येथील भारतीय संस्कृती संरक्षण संस्थेचे डॉ. नंदकिशोर एकबोटे आणि समृद्धी एकबोटे या दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. रक्षाबंधनानिमित्त सैनिकांना राख्या पाठविण्याच्या उपक्रमाचे त्यांचे यंदाचे अकरावे वर्ष असून, या वेळी तीस हजार राख्या सैनिकांना रवाना झाल्या आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com