Modi in Nagpur : पंतप्रधान मोदींनी दाखवला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

Modi in Nagpur : पंतप्रधान मोदींनी दाखवला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

नागपूर | Nagpur

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले.

नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे. आज वंदे भारतला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर वंदे भारत ट्रेनचे बुकींग सर्वसामन्यांसाठी खुले झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रिडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. तिथे पंतप्रधान 'नागपूर मेट्रो टप्पा 1'चे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा-२’ ची पायाभरणीही करणार आहेत.

त्यानंतर नरेंद्र मोदी नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते 'एम्स नागपूर' रुग्णालयाचे लोकार्पण करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com